सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘सारे जहाँ से अच्छा फाउंडेशन’ने हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणारे पोर्टल विकसित केले आहे. या माध्यमातून हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे आता सहजपणे शक्य होणार आहे.
‘प्रोजेक्ट रि-युनिट’ अंतर्गत हरवलेल्या व्यक्तींची एकत्रित माहिती संगणकावर ठेवण्यात येणार आहे. हरवलेल्या व्यक्तीविषयीची माहिती एकत्रित उपलब्ध होण्यासाठी अॅन्ड्रॉइडचा पाया असलेली प्रणाली उपयोगात आणण्यात आली आहे. त्या आधारे कोणतीही व्यक्ती संगणकावर या पोर्टलच्या माध्यमातून हरवलेल्या व्यक्तीच्या माहितीचा डेटाबेस सहजपणाने पाहू शकेल. हरवलेल्या व्यक्तीची माहिती, त्याची ओळख पटविणारी खूण आणि छायाचित्र हे पोर्टलद्वारे ठेवण्यात येणार आहे. हरवलेल्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि मित्र आपल्या हरवलेल्या आप्ताची माहिती ऑनलाइन ठेवू शकेल. हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागल्यानंतर त्याची माहिती देखील या पोर्टलवर प्रसारित केली जाणार आहे. पोलीस विभाग, शहरातील रुग्णालये  आणि सामान्य नागरिकांसाठी या पोर्टलचा उपयोग होऊ शकेल. यामध्ये देशातील किंवा परदेशातील कोणताही व्यक्ती हरवलेल्या व्यक्तीची माहिती इंग्रजीमध्ये प्रसारित करू शकेल. भविष्यामध्ये या पोर्टलद्वारे पोस्टर प्रिटिंग, फेसबुक, ट्विटर, गुगल आणि फेस मॅचिंग फिचर या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सारे जहाँ से अच्छा फाउंडेशनचे संचालक एन. राजा आणि या प्रकल्पाचे तांत्रिक भागीदार आनंद हरिहरन यांनी मंगळवारी दिली. या संदर्भात अधिक माहितीसाठी ९८५०५०८३१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’