News Flash

खाणीत मृतदेह सापडलेल्या युवक-युवतीची ओळख पटली

लोहगाव येथील अगरवाल खाणीत मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास युवक-युवतीच्या सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या दोघांनी प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

| March 14, 2013 01:15 am

लोहगाव येथील अगरवाल खाणीत मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास युवक-युवतीच्या सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या दोघांनी प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पूजा धनराज चव्हाण (वय १७, रा. रेल्वे क्वार्टर, ताडीवाला रस्ता) आणि समीर हमीद सय्यद (वय २१, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे त्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलोहगाव येथील अगरवाल खाणीत युवक-युवतीचा मृतदेह असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यानुसार ही माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली. त्यांनी जाऊन हे मृतदेह काढले. युवकाकडे सापडलेल्या मोबाईलमधील क्रमांकावरून त्याची ओळख पटविण्यात आली. गेल्या शुक्रवारी पूजा हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. पूजाचे नातेवाईक हे समीरच्या घराजवळच राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती. पण, त्यांच्या प्रेमप्रकरणाला कोणाचा विरोध नव्हता. पूजाचे नववीपर्यंत शिक्षण झाले असून समीरचा हॉटेलचा स्टॉल होता. या दोघांनी शुक्रवारी रात्रीच आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 1:15 am

Web Title: love affair is the reason behind suicide of couple in agarwal mine
Next Stories
1 अडीच वर्षे महापौरपद भूषवण्याचे मोहिनी लांडे यांचे संकेत
2 स्त्रियांना वेगळं पाडणारी धोरणे नकोत..हवी समानतेची वागणूक!
3 हंडा रिकामाच घुमे, दे रे आभाळा दे पाणी..
Just Now!
X