04 March 2021

News Flash

‘लोणावळा मगनलाल चिक्की’चे मालक आगरवाल यांचे निधन

ध्रुव मोहनशेट आगरवाल (वय ६०) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले

| September 7, 2015 03:05 am

लोणावळ्याच्या सुप्रसिध्द मगनलाल चिक्कीचे मालक व माजी उपनगराध्यक्ष ध्रुव मोहनशेट आगरवाल (वय ६०) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
लोणावळ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ध्रुवशेट १ सप्टेंबरपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. चिक्कीच्या व्यवसायासोबतच लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, रोटरी व लायन्स क्लबचे अध्यक्ष, सरस्वती महोत्सवाचे सदस्य, मावळ वार्ता फाऊंडेशनचे संचालक, वसंत व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष अशा विविध क्षेत्रांत ते कार्यरत होते. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. लोणावळ्याच्या कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 3:05 am

Web Title: maganlal chikki dhruv agarwal lonavala
टॅग : Lonavala
Next Stories
1 िपपरी भाजीमंडईत ४०० किलो ‘कांदेचोरी’
2 हा तर पुरोगाम्यांचा दहशतवाद – प्रा. शेषराव मोरे यांचे टीकास्त्र
3 संघ सरकार चालवत नाही! – राजनाथ सिंह
Just Now!
X