News Flash

आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टरांअभावी वैद्यकीय सेवा पुरविणे जिकिरीचे – डॉ. अशोक बेलखोडे

नातू फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘महादेव बळवंत नातू’ पुरस्कार यंदा डॉ. अशोक बेलखोडे यांना देण्यात आला.

| January 13, 2015 03:13 am

आदिवासी व ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असून, त्याअभावी आदिवासींना आरोग्य सेवा पुरविणे जिकिरीचे जात आहे. त्यामुळेच गंभीर आजारांवरच्या उपचारांपासून आदिवासी वंचित राहत आहेत, असे मत किनवट येथील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केले.
नातू फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘महादेव बळवंत नातू’ पुरस्कार यंदा डॉ. अशोक बेलखोडे यांना देण्यात आला. तर, रायगड जिल्ह्य़ात वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी शिक्षणाचे कार्य करणाऱ्या ठमाताई पवार यांना ‘सेवाव्रती कार्यकर्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी बेलखोडे पुरस्काराला उत्तर देताना बोलत होते. औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णलयाचे संस्थापक सदस्य डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी नातू फाउंडेशनचे विश्वस्त दत्ता टोळ, चंद्रशेखर यार्दी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात १५ वर्षांपून अधिक काळ प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच या वेळी विविध सामाजिक संस्थांना देणगी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 3:13 am

Web Title: mahadeo balwant natu award to dr ashok belkhode
Next Stories
1 संगीत ही गुरुमुखी विद्याच – पं. उल्हास कशाळकर
2 श्रोत्यांमुळेच मी ‘गायिका प्रभा अत्रे’!
3 वसुंधरा आंतरराष्ट्रीय महोत्सवात १४० लघुपट पाहण्याची संधी
Just Now!
X