महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात अभिवादनासाठी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या पुणे शहर व जिल्हा शाखेतर्फे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंडितराव जाधव, समता सैनिक दलाचे मेजर अर्जुन कांबळे, प्रा. एस. पी. सोळस, अंबादास कांबळे यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस’तर्फे शहराध्यक्ष शैलेंद्र जाधव, नरेश साळुंके, अ‍ॅड. अशोक भोसले यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. ‘फुले-साठे-आंबेडकर विचार फाऊंडेशन’, ‘शिवशक्ती- लहुशक्ती विचार मंच’ व ‘लहु गर्जना ग्रुप’तर्फे संघटनेच्या शाखांनी व्यसनमुक्ती अभियान, पाणीबचतीबाबत जनजागृती कार्यक्रमासह मधुमेह व रक्तगट तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनचे संस्थापक मोहन सोनवणे, राजेश व्यास, प्रकाश शहा या वेळी उपस्थित होते. ‘सामाजिक समरसता मंचा’तर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे सहसंघचालक रवींद्र वंजारवाडकर, नंदकुमार राऊत, शशिकांत बराटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘आंबेडकरी बौद्धधर्म समाजा’तर्फे युगानंद साळवे यांच्या हस्ते ‘अस्पृशांची शाळा’ या पत्रकाचे वाटप करण्यात आले. अभयसिंह साळवे, भारतसिंह साळवे या वेळी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष अनिल अगावणे, श्रावणबाळ फाऊंडेशनचे अध्यक्ष मयूर कडू, ललितकुमार अगावणे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. ‘स्त्री आधार केंद्रा’तर्फेअध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, शेलार गुरुजी, सरोज पाईकवार यांच्यातर्फे आदरांजली वाहण्यात आली. जनता दलाचे नेते अशोक गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महेदवी समाजाचे अध्यक्ष आपुब लुकडे यांच्या उपस्थितीत तर ‘युनिटी फॉर फ्रीडम फाऊंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष भगवान वायाळ, नगरसेवक दिलीप गिरीमकर यांच्यातर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, प्रकाश सातपुते, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार, मानवाधिकार विभागाचे अध्यक्ष रामदास मारणे आदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्ष रुपाली चाकमकर, शिवसेनेतर्फे शहरप्रमुख विनायक निम्हण, संघटक अजय भोसले यांच्यातर्फे, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. उज्ज्वला हाके, ओबीसी एनटी पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष राधिका मखामले यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांत अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन जनशक्ती, रिपब्लिकन संघर्ष दल, रिपब्लिकन सेनेतर्फेही आदरांजली वाहण्यात आली.