पुणे : साखर उद्योगाची माहिती सर्वाना होण्यासाठी शिवाजीनगर येथील साखर संकु ल परिसरात प्रस्तावित के लेल्या जागतिक दर्जाच्या साखर संग्रहालयासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात के ली.

जगात बर्लिन, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलिया येथे साखर संग्रहालये आहेत. जगात ब्राझीलनंतर भारत देश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सर्वाधिक उलाढाल असलेल्या उद्योगाची माहिती सर्वाना होण्यासाठी साखर संकु ल येथे पाच एकर जागेत हे संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्य सरकारला पाठवला होता. याबाबतचे सादरीकरण वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत के ले होते.

या संग्रहालयात ऊस उत्पादन, साखरेचे उत्पादन, गूळ, साखरेपासून तयार होणारे उपपदार्थ यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. त्याकरिता संग्रहालयात छोटेखानी साखर कारखाना उभारण्यात येणार आहे. कारखान्यांमधील आसवनी प्रकल्प, इथेनॉल, कं पोस्ट खत, सहवीज निर्मिती कशी होते? याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. याशिवाय जागतिक व देशांतर्गत साखरेसंबंधी माहिती, गूळ व साखर कारखान्यांची सूक्ष्म प्रतिकृती, साखर उद्योगाबाबत डिजिटल प्रदर्शनी, प्रेक्षागृह, कॅ फे , ग्रंथालय, कलादालन, सभागृह या गोष्टींचा समावेश असणार आहे.

..म्हणून पुण्यातच संग्रहालय

पुणे जिल्हा ऊस लागवडीमध्ये राज्यात अग्रणी आहे. जिल्ह्य़ातील ऊस संशोधन के ंद्रात नवीन उसाच्या वाणांची निर्मिती, अद्ययावत ऊस लागवड तंत्रज्ञानाबाबत संशोधन के ले जाते. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्येही उस लागवड, उत्पादन व संशोधन होते. साखर आयुक्तालय पुण्यात असून या ठिकाणी संग्रहालयासाठी मुबलक जागा उपलब्ध असल्याने पुण्यातच साखर संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.