पाणी-टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये या वर्षीही पुणे जिल्हा अग्रेसर राहील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.

pune-1

पुणे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी संचलन करून पालकमंत्री बापट यांना मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, गत वर्षी जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा झाला. या पार्श्वभूमीवर पुणे शहर, ग्रामीण भागाला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा. यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, स्मार्ट सिटी योजनेतील कामांना सुरुवात झाली असून शहराच्या विकास आराखडयाला मंजूरी मिळाल्यामुळे शहर आणि उपनगरामध्ये पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.

pune-3

 

pune