News Flash

“…मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय,” नियंत्रण कक्षात फोन करणाऱ्या पुणेकरांना आश्चर्याचा धक्का

अनिल देशमुखांनी पोलिसांसोबत साजरं केलं नववर्ष

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी वायरलेसवरुनही कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन काही लोकांच्या तक्रारीदेखील ऐकून घेतल्या. पोलीस थकले जरूर पण हिंमत हारलेले नाहीत असं म्हणत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली.

अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात नववर्ष साजरा करताना नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः काही कॉल घेतले. यामध्ये एका नागरिकाने सोसायटी परिसरात मोठ्याने गाणी वाजत असल्याची तक्रार केली असता अनिल देशमुख यांनी त्यांना आपली तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला सांगतो असं कळवलं. थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने पुणेकरालाही आश्चर्याचा धक्का बसला.

काय संवाद झाला:
अनिल देशमुख : हॅलो नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत आहे. आपली काय तक्रार आहे. आपल्या सोसायटीचे नाव काय आहे.
तक्रारदार : अहो साहेब मी सनसिटी जवळील शिवसागर सोसायटी परिसरातून बोलत आहे. आमच्या सोसायटीच्या परिसरात जोरात गाणी वाजत आहे. खूप त्रास होत आहे.
अनिल देशमुख: आपल्या जवळील पोलीस स्टेशनला लगेच तक्रार सांगतो. तुमचं नाव काय?
तक्रारदार: माझ नाव इंद्रनील आपटे आहे.
अनिल देशमुख: या तक्रारीबद्दल आपणास कळवितो आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

अजित पवारांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन; जनतेला केलं आवाहन

पोलीस थकलेत पण हिंमत हारले नाहीत
“करोनाशी लढताना आमचे ३०० च्या आसपास पोलीस कर्मचारी शहीद झाले. गेल्या दहा महिन्यांपासून आमचे पोलीस काम करत आहेत. आमचे पोलीस थकले जरूर आहेत. पण हिंमत हारलेले नाहीत. या परिस्थितीतही कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत आहेत. आम्ही आशावादी आहोत की, पुढील वर्ष करोनामुक्त होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना काम करायचं आहे. तसंच महाराष्ट्र लवकरच करोना मुक्त होईल अशी आशा व्यक्त करत,” असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

मार्च महिन्याच्या अधिवेशनात शक्ती कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न राहणार
“महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत वाढत्या घटना लक्षात घेता संबधित आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही शक्ती कायदा आणत आहोत. तो साधारण मार्च महिन्यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा आणून मंजूर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार,” असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीसांकडे लक्ष देण्याची गरज नाही”
सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे. त्या प्रश्नावर देशमुख म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही”.

कुणी तरी फूस लावून महेबूब शेख यांना बदनाम करत आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मेहबूब शेख यांना महिलेवरील अत्याचार प्रकरणी अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर देशमुख म्हणाले की, “या प्रकरणी तेथील पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी केली असून मागील एक वर्षात कोणत्याही प्रकाराचा संवाद झाला नाही अशी माहिती तपासातून पुढे येत आहे. यामध्ये काही तरी राजकारण आहे. कोणी तरी फूस लावून महेबूब शेख यांना बदनाम करत आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 8:59 am

Web Title: maharashtra home minister anil deshmukh celebrate new year with pune police svk 88 sgy 87
Next Stories
1 करोनानंतर फार मोठा बदल होईल असं वाटत नाही – प्रकाश आंबेडकर
2 Welcome 2021: गृहमंत्री देशमुखांनी पुणे पोलिसांसोबत केलं नववर्षाचं स्वागत
3 मुद्रांक शुल्कापोटी ११५ कोटींचा महसूल
Just Now!
X