28 January 2020

News Flash

स्वच्छतेच्या अभियानात महाराष्ट्र अव्वल – पंकजा मुंडे

स्वच्छ भारत अभियान हे केंद्राचे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान असून यात महाराष्ट्र अव्वल आहे.

पंकजा मुंडे

स्वच्छ भारत अभियान हे केंद्राचे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान असून यात महाराष्ट्र अव्वल आहे. लोकसहभागामुळेच हे शक्य झाले आहे, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या स्वच्छता िदडी व ग्रामसभा िदडीची सुरुवात विधानभवनात मुंडे यांच्या हस्ते झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, ‘वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात वृक्षलागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. वन विभाग व ग्रामविकास विभाग मिळून हे काम करत आहेत. हे अभियान यापुढेही सुरु ठेवण्यात येणार आहे. पंढरपूरची वारी हा राज्यातील सर्वात मोठा सोहळा आहे. या निमित्ताने वारकऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश राज्यात पोहोचणार आहे. केंद्राच्या स्वच्छ अभियान उपक्रमात महाराष्ट्र अव्वल असून राज्यातील सहा हजार ९३ ग्रामपंचायती, १४ तालुके व एक जिल्हा हागणदारी मुक्त झाला आहे. ही किमया लोकसहभागातून साधली आहे.’

बापट म्हणाले,‘‘सरकारच्या कोणत्याही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून आणि दारापासून स्वच्छतेची सुरुवात करावी.’’

First Published on July 2, 2016 4:35 am

Web Title: maharashtra is in cleanliness campaign
Next Stories
1 ठाण्यातील काही भागांत आज वीज नाही
2 आंतरराष्ट्रीय योगदिन कोल्हापुरात उत्साहात
3 ७७६ रस्ते खड्डय़ांतच!
Just Now!
X