महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके या दोन मल्लांची झुंज रंगली होती. मात्र जेव्हा हर्षवर्धन सदगीर विजयी झाल्याची घोषणा झाली तेव्हा हर्षवर्धनने पुढच्याच क्षणी स्पर्धा संपवून आपल्या सहकाऱ्याला म्हणजेच शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून घेतलं. खरंतर दोस्तीत कुस्ती अशी म्हण आहे. मात्र कुस्ती संपली आता दोस्ती असंच बहुदा मनाशी म्हणत हर्षवर्धन सदगीरने आपल्या सहकाऱ्याला म्हणजेच जो प्रतिस्पर्धी शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून धरलं.

हर्षवर्धन सदगीरने शैलेशला जेव्हा खांद्यावर उचलून धरलं तो क्षण सगळ्यांनीच डोळ्यात साठवून घेतला. हर्षवर्धन सदगीर या मल्लाने फक्त महाराष्ट्र केसरीची गदाच जिंकली नाही तर उपस्थितांची मनंही जिंकली. शैलेश आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये चाललेला सामना चुरशीचा होता. हे दोघेही वस्ताद काका पवार यांच्याच तालमीत तयार झालेले मल्ल. त्यामुळे साहजिकच दोघांना एकमेकांची कुस्ती खेळायची शैली माहित होती. त्यामुळे सुरुवातीला हा सामना काहीसा संथ झाला होता. मात्र नंतर या सामन्यातली चुरस वाढली. एक गुण जिंकून शैलेशने आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. अशात मोक्याच्या क्षणी हर्षवर्धनने बाजी मारली आणि शैलेशवर ३-२ अशी मात केली. त्यामुळे शैलेश जिंकेल की काय ? असं वाटत असतानाच हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
Bird Wardha
आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी
selfie parent letter cm eknath shinde
सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मात्र हे सगळं झालं मॅटवर. हर्षवर्धन सदगीर विजयी झाला ही घोषणा सरपंचांनी जेव्हा केली तेव्हा हर्षवर्धनला आनंद तर झालाच. मात्र त्याच आनंदात हर्षवर्धनने त्याच्यातल्या खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. प्रतिस्पर्धी आणि त्याचा सहकारी असलेला शैलेश शेळके याला हर्षवर्धनने खांद्यावर उचलून घेतलं.