News Flash

पुणेकरांची चिंता वाढली; दररोज वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येत मुंबईच्या पुढे

चिंता वाढवणारी बातमी

संग्रहित (Photo Courtesy: Reuters)

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वात भयानक परिस्थिती असून देशाती एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्यात पुणे आणि मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. करोनाबादित रुग्णांमध्ये राज्यात मुंबई आघाडीवर असली तरी मागील काही दिवसांपासून दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णसंख्येत पुणे पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे. करोना रुग्णवाढीत मुंबईला मागे टाकल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात दररोज १५०० पेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत तर मुंबईत दररोज १२०० ते १३०० रुग्ण आढळत आहेत.

गुरुवारी पुणे शहरात दिवसभरात १८८२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर करोनामुळे १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या आता ३१ हजार ८८४ एवढी झाली आहे. पुण्यात आज अखेरपर्यंत ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गुरुवारी मुंबईत गुरुवारी नवीन १४९८ रुग्णांची नोंद झाली असून ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांचा एकूण आकडा ९७ हजाराच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या ५५२० वर गेली आहे.

बुधवारी पुण्यात १,४१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मुंबईत बुधवारी मुंबईत बुधवारी १,३९० नवीन रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये मंगळवारी ९६९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली; तर ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पुण्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे आहे.

राज्यात ८,६४१ जणांना संसर्ग

राज्यात गेल्या २४ तासांत ८,६४१ रुग्ण आढळले असून, राज्यातील आतापर्यंतचा रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. मुंबईपेक्षा पुणे महापालिका हद्दीत जास्त रुग्णांचे निदान झाले. राज्यात २६६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात ११,१९४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकू ण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ८४ हजार झाली आहे.

महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी जवळपास ४८ टक्के रुग्ण या दोन राज्यांत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 3:18 pm

Web Title: maharashtra mumbai pune corona virus updat nck 90
Next Stories
1 पुण्यात लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना समज देण्यासाठी अवतरले ‘यमराज’
2 पुणे : मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन
3 पुण्यात लॉकडाउनच्या एक दिवसआधीच चोरट्यांनी साधला डाव, लंपास केली पावणे तीन लाखाची दारू
Just Now!
X