पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा पंचायतने १ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी अवघ्या महाराष्ट्रात ‘बोंबाबोंब’ आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, रिक्षा पंचायतने पुकारलेल्या बंदमध्ये कोणीही सहभागी होणार नाही, असे देखील ते म्हणाले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात १ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतने विरोध दर्शविला आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले की, आम्ही या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. ३० सप्टेंबर रोजी आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत. रिक्षा पंचायतने पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये संप पुकारलेला आहे त्याला आमचा विरोध आहे. सध्या प्रत्येक नागरिक म्हणत आहे व्यवसाय करायला मुभा द्या अशा परिस्थिती जो बंद पुकारला गेला आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. अगोदरच रिक्षा चालक संकटात आहे. त्यात बंद पुकारून रिक्षा चालकाला आर्थिक खाईत लोटलं जात आहे. रिक्षा पंचायतची ही चुकीची भूमिका आहे. या बंदला आमचा विरोध आहे, यात कोणीही सहभागी होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 2:16 pm