News Flash

दहावीचा पुणे विभागाचा निकाल ९२.८ टक्के

राज्याच्या निकालात पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर आहे.

गेल्या वर्षीपेक्षा निकालात किंचितशी वाढ

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९२.८ टक्के लागला. गत वर्षीच्या तुलनेत यंदा थोडी, म्हणजे ०.८५ टक्के वाढ झाली आहे. राज्याच्या निकालात पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्य़ाचा निकाल ८९.६६ टक्के आहे.

पुणे विभागात पुण्यासह नगर आणि सोलापूर या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. यंदा विभागातील ३ हजार ३९० शाळांतील २ लाख ८४ हजार १० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील २ लाख ५४ हजार १४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९२.८ आहे. गेली दोन वर्षे पुणे विभागाच्या निकालात घसरण होत होती. मात्र, यंदा हा निकाल वाढल्याचे दिसून येत आहे.

पुणे विभागात पुणे जिल्ह्य़ाची टक्केवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्य़ांच्या तुलनेत अधिक आहे. पुणे जिल्ह्य़ातील परीक्षा दिलेल्या १ लाख २९ हजार ३५१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २० हजार २७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाढलेल्या निकालासह ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा सुमारे २ हजारांनी अधिक आहे. यंदा विभागातील ११ हजार ९६१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळाले आहेत. विशेष श्रेणी मिळवणारे विद्यार्थीही वाढले आहेत. मागील वर्षी विशेष श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६४ हजार ७०३ होती, तर यंदा ७३ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. प्रथम श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काहीशी घट झाली. मागील वर्षी ९४ हजार ९५४ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली होती, तर यंदा ९१ हजार ६०८ विद्यार्थ्यांना ही श्रेणी मिळाली आहे.

दरवर्षीप्रमाणेच यंदा निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पुणे विभागात ५ हजार ९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर २ हजार १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. पुनर्परीक्षार्थीचा निकाल ४५.७६ टक्के लागला. पुणे विभागापेक्षा कोकण आणि कोल्हापूर विभाग निकालात सरस ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 3:08 am

Web Title: maharashtra ssc 10th result 2018 pune district
Next Stories
1 एसटीच्या अचानक संपाने प्रवाशांचे हाल
2 पालखी सोहळय़ांना देणाऱ्या भेटवस्तूंची पिंपरीत अधिकारी, पदाधिकाऱ्यांना धास्ती
3 ‘साहेब, फ्लेक्सच्या कामाचे पैसे द्या ना!’
Just Now!
X