राज्य मंडळाचा दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज, सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर १५ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील. यंदापासून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या कलचाचणीचे निष्कर्षही १५ जूनला गुणपत्रकाबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठीचा अर्जाचा नमुना राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दहावीच्याही निकालाची टक्केवारी घसरली, कोकण विभाग ठरला अव्वल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे

http://www.result.mkcl.org
http://www.maharashtraeducation.com
http://www.rediff.com/exams
http://maharashtra10knowyourresult.com
http://www.mahresult.nic.in

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc results will be out at 1 pm on june
First published on: 06-06-2016 at 00:56 IST