गत २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ते जून्नरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी शरद सोनावणेंचा पराभव केला. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत मनसेचे राज्यात १३ आमदार निवडून आले होते. पण २०१४ मध्ये शरद सोनावणे यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार निवडून आला.

लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यंदा शिवसेनेने त्यांना जून्नरमधून उमेदवारी सुद्धा दिली. पण आशा बुचके यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला फटका बसला व शरद सोनावणे पराभूत झाले. आशा बुचके जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

narayan rane vs vinayak raut
समाजवादाकडून हिंदुत्वाकडे झुकलेल्या तळकोकणात रंगतदार सामन्याची प्रतीक्षा… राणे वर्चस्व राखणार की राऊत हॅटट्रिक करणार?
Jalna Lok Sabha, Raosaheb Danve, Kalyan Kale,
जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

आशा बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढवत ५० हजारपेक्षा जास्त मते घेतली व शरद सोनावणे यांचा मार्ग बिकट केला. राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांना ७४ हजार, शरद सोनावणे यांना ६५ तर आशा बुचके यांना ५० हजार मते मिळाली. बुचके यांच्या बंडखोरीमुळे शरद सोनावणे यांचे दुसऱ्यांदा विधानसभेवर जाण्याचे स्वप्न भंगले.