News Flash

जगातील दोन हजारांमध्ये राज्यातील सहा शिक्षण संस्था

गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध निकषांवर मूल्यमापन

गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध निकषांवर मूल्यमापन

पुणे : ‘सेंटर फॉर वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या क्रमवारीमध्ये राज्यातील शिक्षण संस्थांनी स्थान प्राप्त के ले आहे. या क्रमवारीत जगभरातील दोन हजार शिक्षण संस्थांचा समावेश असून, राज्यातील सहा शिक्षण संस्थांनी त्यात स्थान मिळवले आहे.

सेंटर फॉर वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिं ग २०२१-२२ ही क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. जागतिक पातळीवरील क्रमवारीत पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे हार्वर्ड विद्यापीठ, मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ या संस्था आहेत. देशातील ६८ शिक्षण संस्थांचा या यादीत समावेश आहे. क्रमवारीतील शिक्षण संस्थांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना मिळालेले रोजगार, संशोधनातील कामगिरी, प्राध्यापक अशा निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. तर देशातील शिक्षण संस्थांमध्ये आयआयएम अहमदाबाद या यादीत पहिल्या स्थानी आहे.

जागतिक पातळीवरील दोन हजार संस्थांमध्ये राज्यातील सहा संस्थांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फं डामेंटल रीसर्च ५४३ व्या स्थानी आहे. त्यानंतर आयआयटी बॉम्बे (५६७), पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) (१०२४) यांचा क्रमांक लागतो. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १३८९ व्या, मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट १६६६ व्या आणि मुंबईचीच इन्स्टिटय़ूट ऑफ के मिकल टेक्नॉलॉजी १८५८ व्या स्थानी आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांपैकी केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. तसेच राज्यातील खासगी विद्यापीठांपैकी एकाही विद्यापीठाला या क्रमवारीत स्थान मिळवता आलेले नाही.

* मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च ५४३ व्या स्थानी आहे.

* आयआयटी बॉम्बे (५६७), पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) (१०२४) यांचा क्रमांक लागतो.

* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १३८९ व्या, मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट १६६६ व्या आणि मुंबईचीच इन्स्टिटय़ूट ऑफ के मिकल टेक्नॉलॉजी १८५८ व्या स्थानी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 1:20 am

Web Title: maharastra six educational institution get place in center for world university rankings zws 70
Next Stories
1 करोनाच्या दुसऱ्या लाटेचा बासमतीला फटका
2 शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची दहा तपांची वाटचाल
3 नगरसेवकांना ‘स्वच्छ’चे वावडे
Just Now!
X