25 September 2020

News Flash

माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी साडेपाच कोटींचा निधी सुपूर्द

माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच कोटी ५५ लाख रूपये गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले.

| January 8, 2015 07:22 am

माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच कोटी ५५ लाख रूपये गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. आतापर्यंत माळीण गावातील मृत व्यक्तींच्या वारसांसाठी सात कोटी ५५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील माळीण दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तींच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रूपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मानवतावादी दृष्टीकोनातून पुनर्वसनासाठी तातडीचे सहाय्य म्हणून १ ऑगस्ट २०१४ रोजी दोन कोटी रूपये तातडीने उपलब्ध करून देण्यात आले होते. उर्वरित पाच कोटी ५५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. जिल्हाधिकाऱय़ांकडून ही रक्कम संबंधितांना वितरीत केली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2015 7:22 am

Web Title: malin incident funds of 5 55 crores handover to pune district collector
Next Stories
1 खासगी शिष्यवृत्ती परीक्षांचे पुण्यात पेव!
2 रिक्षाचालकांचे पैसे थकल्यामुळे क्रीडानिकेतन बंद
3 कोयना-चांदोली अभयारण्यांदरम्यान भ्रमणमार्गावरच शेकडो वृक्षांची तोड
Just Now!
X