मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात नऊ महिन्यांच्या चिमुकलीसह एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सुमित रोचलाणी आणि ह्रतिका रोचलानी असे मयत वडील आणि चिमुकलीचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान ताजे पेट्रोलपंपाजवळ  हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुंबईच्या दिशेने निघालेल्या एम-एच ४७ के ४४५९ या अर्टिगा गाडीला भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर एम-एच ०५ सी एम १२१५ या गाडीने पाठीमागून जोरात धडक दिली. यात दोन्ही गाड्या रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्या. यात स्विफ्ट डिझायरमधील सुमित रोचलाणी (वय २८ रा.उल्हास नगर ठाणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी चिमुकलीने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

अपघातातील जखमींवर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात रवी तुळशीराम रोचलानी (वय २५), विना ज्ञानचंद रोचलाणी (वय ४८) आणि मयत चिमुकलीच्या आईचा समावेश आहे. यातील तिघांवर अतिदक्षता भागात उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अर्टिगातील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.