News Flash

रेमडेसिविरची चढय़ा भावाने विक्री करणाऱ्या एकास अटक

विशाल अनंता मोरे (वय २८, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची चढय़ा भावाने विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने सिंहगड रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आली.

विशाल अनंता मोरे (वय २८, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील (एफडीए) औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेमडेसिविरची काळ्या बाजारात चढय़ा भावाने विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी गुन्हे शाखेकडून पथके तयार करण्यात आली आहेत. सिंहगड रस्त्यावर एक जण रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून मोरेला पकडले. त्याच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक ढेंगळे तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 4:04 am

Web Title: man arrested for selling remdesivir at high cost zws 70
Next Stories
1 झटपट लसीकरणासाठी ‘को-विन’च्या प्रारूपाचा वापर
2 ‘केंद्राचे लसीकरण धोरण चुकीचे’
3 VIDEO: पुण्यात तरुण-तरुणींची फार्म हाऊसवर सुरू होती पार्टी; पोलीस पोहोचले अन्…
Just Now!
X