News Flash

पुणे : दहशत पसरविण्यासाठी सराईत गुन्हेगारानं केला गोळीबार

पोलिसांनी शिताफीनं केलं अटक

प्रतिनिधिक छायाचित्र

एका सराईत गुन्हेगारांना एका व्यक्तीला मारहाण करत परिसरात दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. प्रशांत लांडगे असे मारहाण झालेल्या व्यक्ती चे नाव असून त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रशांत लांडगे हा घरी होता. तेव्हा सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे यांनी घरी जाऊन दरवाजाची बेल वाजवली. फिर्यादी हे घराबाहेर येताच त्यांना शिवीगाळ करून आरोपी आणि इतर दोघांनी मारहाण केली. फिर्यादी प्रशांत यांनी आरडाओरड केली. त्यावेळी इतर नागरिक जमा झाले. तेव्हा सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलातून हवेत गोळीबार करून फिर्यादीच्या गळयातील ५ तोळे सोन्याची चैन हिसकावली. दरम्यान, आरोपी गणेश धोत्रे याने हातातील कुऱ्हाडीने, तर मल्लेश कोळवी याने लाकडी काठीनं घराचे समोरील सामानाची तोडफोड करून दहशत निर्माण केली. त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षण राजेंद्र कुंटे हे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 1:07 pm

Web Title: man beaten by three person in pune bmh 90 kjp 91
Next Stories
1  ‘पदवीविनाही कला आत्मसात करता येते याचे मी उत्तम उदाहरण’
2 आझाद हिंद एक्सप्रेसच्या डब्यात एके-४७ रायफलची काडतुसे सापडली
3 कोथरूडमध्ये रिक्षाचालकाने ज्येष्ठ महिलेकडील रोकड लुटली
Just Now!
X