News Flash

फेसबुकवरून विवाहित महिलेने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तणावात येऊन तरुणाची आत्महत्या

संबंधित महिला तरुणाला शारीरिक संबंध ठेव असे म्हणत होती...

संबंधित महिला तरुणाला शारीरिक संबंध ठेव असे म्हणत होती. 

पुणे जिल्ह्यातील आळंदीत विवाहित महिलेने वीस वर्षीय तरुणाला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, माझ्या सोबत शारीरिक संबंधत ठेव असे म्हणून पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणाला कंटाळून आणि बदनामी होण्याच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली असून याप्रकरणी विवाहित महिले विरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा तरुण हा एसवायबीकॉम या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांच्यात फेसबुक मेसेंजरद्वारे अश्लील चॅट झाले. हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालले. परंतु, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून वीस वर्षीय तरुणाकडून विवाहित महिलेने पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकी तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळला होता. तो मानसिक तणावात गेला. हा सर्व प्रकार १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत घडला. अखेर तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन लावून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचं देखील बहिणीला सांगितलं. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात विवाहित महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 1:53 am

Web Title: man commits suicide after facebook friend married women blackmailing for money zws 70
Next Stories
1 भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का?
2 पुण्यात दिवसभरात २९२ नवे करोनाबाधित, ९ रुग्णांचा मृत्यू
3 संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता कारवाई का करत नाही? – रामदास आठवलेंचा सवाल
Just Now!
X