X

विकृती! पिंपरीत महिलेच्या घरासमोर हस्तमैथुन, तरुणाला अटक

दिलीप यादव हा मूळचा अलाहाबादचा असून तो सध्या वाकडमधील काळेवाडी येथे कामाला होता.  तो गवळी काम करत होता. दिलीपने ३१ वर्षांच्या महिलेच्या घरासमोर हस्तमैथुन केले.

पिंपरी- चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात एका विकृत तरुणाने महिलेसमोर हस्तमैथुन केल्याची घटना घडली आहे. वाकड पोलिसांनी विकृत तरुणाला अटक केली असून दिलीप यादव (वय ३८) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वीही दोन ते तीन महिलांसमोर असे कृत्य केले होते. मात्र, त्यावेळी महिलांनी भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहितीही समोर आली आहे.

दिलीप यादव हा मूळचा अलाहाबादचा असून तो सध्या वाकडमधील काळेवाडी येथे कामाला होता.  तो गवळी काम करत होता. दिलीपने ३१ वर्षांच्या महिलेच्या घरासमोर हस्तमैथुन केले. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने दिलीपला अटक केली.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दिलीपने यापूर्वीही परिसरातील दोन ते तीन महिलांसमोर हस्तमैथुन केले होते. मात्र, त्या महिलांनी भीतीपोटी तक्रारच दाखल केली नाही. एकट्या महिला किंवा लहान मुलींना गाठून त्यांच्यासमोर हस्तमैथुन करण्याची विकृती दिलीपमध्ये होती.  दिलीप हा अविवाहित असून तोपूर्वी कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात राहायचा.

First Published on: September 11, 2018 4:33 pm