22 January 2021

News Flash

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून दुसर्‍या पत्नीचा गळा दाबून खून

आरोपीला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत होता. तसेच पती-पत्नीमध्ये याच कारणामुळे सतत वादही सुरु होते. याच वादातून पतीनं पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे ही घटना घडली आहे. मृत महिलेचं नाव अपर्णा महाडिक (वय ३६) असे आहे. तर सुरेंद्र साळुंखे (वय ४२) असे खून करणार्‍या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून विचारपूस सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र साळुंखे हा एक व्यावसायिक आहे. काही वर्षापूर्वी त्याचं पहिलं लग्न झालं होतं. कॉलेजमधील मैत्रीण अपर्णा हिच्यासोबत ओळख होती. लग्न झाले असतानाही सुरेंद्र अपर्णाच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्नही केलं. आरोपी सुरेंद्र याच्या दोन्ही पत्नी वेगळया ठिकाणी राहत होत्या. दुसरी पत्नी अपर्णा ही घरकाम करत होती. दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करण्यास सुरेंद्रचा विरोध होता. तसेच सुरेंद्र सतत अपर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. त्यातूनच आरोपी सुरेंद्रने दुसरी पत्नी आपर्णाचा गळा दाबून खून केला.

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. काही तासांतच हडपसर पोलिसांनी आरोपी सुरेंद्रला अटक केली. चौकशी केली असता खून आपणच केल्याची कबूली त्यानं दिली आहे. या घटनेचा तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2020 8:02 am

Web Title: man mureder second wife in pune hadpasar police arrest nck 90 svk 88
Next Stories
1 टेमघरच्या गळतीची कबुली
2 भुयारी मार्गासाठी स्वारगेट उड्डाणपुलाचे कठडे तोडण्यास सुरुवात
3 गणरायाच्या चरणी सेवा रुजू न झाल्याची खंत
Just Now!
X