News Flash

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली व नंतर प्रियकराने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली व नंतर प्रियकराने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवडच्या दापोडी सीएमइ गेट परिसरात घडली आहे. सोमवारी रात्री प्रेयसीचे आणि आरोपी विजय बहादूर यादव यांचे भांडण झाले होते. ‘तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर असं काही तरी करेन की तुला आयुष्यभराची अद्दल घडेल अशी धमकी आरोपी विजय यादव याने दिली होती.

सहा महिन्यांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. सोमवारी रात्री उशिरा आरोपी विजय बहादूर यादव याचे मृत मुलीच्या आईशी भांडण झाले होते. ‘तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर असं काही तरी करेन की तुला आयुष्यभराची अद्दल घडेल अशी धमकी त्याने दिली होती.

मंगळवारी सकाळी आरोपी विजयने प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यानंतर काही वेळाने त्याने जवळी झाडीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मुलीच्या आईचे आणि आरोपीचे अनैतिक संबंध होते. विजय बहादूर यादवने मृत मुलीच्या आईच्या पाठीमागे लग्नाचा तगादा लावला होता. परंतू महिला लग्नाला नकार देत होती. त्यातूनच त्याने हा गुन्हा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 6:29 am

Web Title: man rapes girlfriend daughter killed her in pimpari
Next Stories
1 ‘सीएचबी’ प्राध्यापकांचे मानधन अद्यापही जुन्याच पद्धतीने
2 कमानीचा खर्च तीन कोटी
3 निलाजरेपण कटीस नेसले..
Just Now!
X