27 February 2021

News Flash

पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याने मित्राला मेसेज केला आणि…

गिरजेश यादव हा रिक्षाचालक असून सुनील जाधव हा फूड डिलिव्हरी बॉय आहे. गिरजेश हा विवाहित असून सुनील जाधव हा त्यांच्या शेजारी राहायचा.

प्रतिकात्मक छायाचित्र

मित्र दररोज पत्नीशी गप्पा मारत असल्याने चिडलेल्या पतीने मित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात सुनील राजू जाधव (वय १९) हा तरुण जखमी झाला असून पोलिसांनी गिरजेश यादव याला अटक केली आहे.

गिरजेश यादव हा रिक्षाचालक असून सुनील जाधव हा फूड डिलिव्हरी बॉय आहे. गिरजेश हा विवाहित असून सुनील जाधव हा त्यांच्या शेजारी राहायचा. सुनीलची गिरजेशच्या पत्नीशी ओळख झाली होती. काही महिन्यांनी गिरजेश पत्नीसोबत दुसरीकडे राहायला गेला. यानंतरही सुनील गिरजेशच्या पत्नीच्या संपर्कात होता. दोघेही फेसबुक आणि मेसेजद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांमधील मैत्रीवर गिरजेशच्या मनात संशय आला. त्याने मध्यरात्री पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन सुनीलला मेसेज केला. ‘मी तुला ओळखते, तू पिंपळे सौदागरमध्ये राहतोस, तू मला सहा महिन्यांपूर्वी भेटला होतास. मी घरी एकटीच आहे,तू बळीराम कॉम्प्लेक्सजवळ ये’, असा मेसेज त्याने सुनीलला केला होता.

मेसेज मिळाल्यानंतर सुनील दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे गिरजेश आधीपासूनच थांबला होता. सुरुवातीला दोघांमध्ये वाद झाला. यानंतर गिरजेशने सुनीलवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुनील जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकड पोलिसांनी गिरजेशला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 12:44 pm

Web Title: man send message to friend from wife facebook account stabs him after meeting in pimpri chinchwad
Next Stories
1 पुणे : ताडिवाला रोड भागात पतीकडून पत्नी, अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
2 धक्कादायक! पुणे-मुंबई प्रवासात युवकाला ३४ हजार रुपयाला लुटलं
3 पाणी अहवाल अद्याप सादर नाही
Just Now!
X