News Flash

पळून जाण्यास नकार दिल्याने प्रेयसीवर गोळीबार

खेड तालुक्यातील शिरोली येथील घटना

पुण्याच्या खेड तालुक्यातील शिरोली येथे प्रेम प्रकरणातून तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काजल लक्ष्मण शिंदे असे जखमी तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कृष्णा राजपुतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या खेड तालुक्यातील शिरोली येथे एका तरुणीवर गोळीबार केला. काजल शिंदे (वय वर्ष १७ रा.शिरोली ) असे या तरुणीचे नाव आहे. तर गोळीबार करणाऱ्या मुलाचे नाव कृष्णा राजपूत (वय वर्ष २५ रा.चाकण) असे आहे. प्रेम प्रकरणातून त्याने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. काजल आणि कृष्णाचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते. काजल शिंदे ही अगोदर चाकण येथे कुटुंबियांसोबत राहात होती. मात्र काही कारणामुळे ती खेड तालुक्यातील शिरोली येथे राहण्यास आली. आज सकाळी आठच्या सुमारास काजल ही दूध आणि साखर घेऊन घरी जात होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या कृष्णा या तिच्या प्रियकराने तिच्यावर गोळीबार केला. काजलने पळून जाण्यास नकार दिल्याने कृष्णाने तिच्यावर हल्ला केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या गोळीबारात काजल ही गंभीर जखमी झाली आहे. तिला खेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी कृष्णा राजपूतला ताब्यात घेतले असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2017 1:53 pm

Web Title: man shoots girlfriend for refusing to elope in shiroli pune district
Next Stories
1 Ammunition factory blast : पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू
2 जुनाट वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक
3 हिंजवडी, गहुंजेसह सात गावांना महापालिकेत समावेशाची अजूनही प्रतीक्षा
Just Now!
X