अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे विशेष संगीत संमेलन आणि संगीत शिक्षण अधिवेशन शनिवारपासून (२६ डिसेंबर) तीन दिवस छत्तीसगढ राज्यातील कोरबा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदीर्घ आणि यशस्वी सांगीतिक कार्याची नोंद घेऊन पं. अजय पोहनकर यांना या संमेलनात ‘मानद संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने गौरविण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात पं. अजय पोहनकर यांच्या गायनाबरोबरच यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन, प्रज्ञा मिश्र यांचे गायन, पं. असीम चौधरी यांचे सतारवादन, सम्राट पंडित यांचे गायन, पं. बिरजू महाराज यांच्या शिष्यांचे कथक नृत्य होणार असून पं. विकास कशाळकर, डॉ. सुधा पटवर्धन आणि अजय हेडावू यांचे सप्रयोग व्याख्यान होणार आहे, असे गांधर्व महाविद्यालय मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. माधव वसेकर यांनी कळविले आहे.