मराठी इतिहास, भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे भांडार असलेल्या प्राचीन हस्तलिखितांची समग्र सूची करण्याचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यातील पहिला खंड सिद्ध झाला आहे. अगदी १४ वे शतक या कालखंडापासून राज्यामध्ये सुमारे २० हजार हस्तलिखिते असावीत असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
मराठी हस्तलिखित केंद्र (मराठी मॅन्युस्क्रिप्ट सेंटर) या २००५ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेने मराठी हस्तलिखितांची समग्र सूची करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला. अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठाच्या डॉ. अॅन फेल्डहाऊस आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांनी संपादनाची जबाबदारी स्वीकारली. लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, शिकागो येथील डॉ. जेम्स नाय आणि डॉ. एलिनोर झेलियट यांच्यासह वाई येथील प्राज्ञपाठशाळा आणि लंडन येथील ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले आहे. मराठी हस्तलिखितांच्या समग्र सूचीतील पहिल्या खंडात पुण्यातील ग्रंथालयांच्या संग्रहातील १७५० हस्तलिखितांच्या नोंदींचा अंतर्भाव आहे. उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित या पहिल्या खंडाचे रविवारी (२७ एप्रिल) आनंदाश्रम येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. डॉ. सरोजा भाटे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हस्तलिखितांच्या दोन हजार नोंदी असलेला दुसरा खंड प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या खंडाविषयी वा. ल. मंजूळ म्हणाले, एकटय़ा पुणे शहरातच हस्तलिखितांची संख्या दहा हजार असावी. १८५३ मधील संत नामदेवांची तीर्थावळी, १६९२ मधील ज्ञानेश्वरी यापासून ते १९५० मधील लहानमोठी हस्तलिखिते आहेत. ही सर्व कागदावरची आणि देवनागरी लिपीतील आहेत. चारशे पानांची समर्थाची बखर ही पोथी मोडी लिपीमध्ये आहे. विविध रंगांची चित्रे असलेली हस्तलिखिते वेगवेगळय़ा संस्था, ग्रंथालये, मंदिरे, मठ यांच्या संग्रहामध्ये आणि परंपरा सांभाळणाऱ्या विद्वानांकडे जतन करण्यात आली आहेत. पुण्यामध्येच ज्ञानेश्वरीच्या सव्वाशे हस्तलिखित प्रती आढळून आल्या आहेत. दामाजीपंत, कान्होपात्रा, पुंडलिक यांची चरित्रे, मोरोपंत-वामन पंडित या पंचकवींच्या रचनांची हस्तलिखिते पाहावयास मिळतात. ‘पंढरी माहात्म्याची’ ही संतांच्या अप्रकाशित अभंगांची विविध १४ हस्तलिखिते सापडली आहेत.
सचित्र गुरुचरित्र
महाराष्ट्रामध्ये सचित्र गुरुचरित्राची शंभर हस्तलिखिते सापडली आहेत. कर्नाटकातील गोकाक येथे वास्तव्यास असलेल्या अष्टेकर यांच्या संग्रहामध्ये गुरुदत्तांचे तीन रंगांतील शरीर असलेल्या मूर्तीचे छायाचित्र आढळून आले आहे. यामध्ये गुरुदेव दत्तात्रेयांच्या पायाशी गाय आणि कुत्रा नाहीत. तर, नाटकातील पडद्याप्रमाणे प्रसंग रंगविलेली चित्रे दिसतात, अशी माहिती वा. ल. मंजूळ यांनी दिली.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?