News Flash

कला शाखेतूनही अनेक व्यवसायसंधी!

विद्यार्थ्यांला दहावी उत्तीर्ण होऊन कितीही गुण असल्यास कला शाखेत प्रवेश घेता येतो.

करिअर मार्गदर्शक डॉ. श्रीराम गीत यांचे मत
पुणे : कला शाखेत शिक्षण घेऊन प्रसिद्ध झालेल्या शशी थरूर, हरीश साळवे अशा अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे कला शाखा म्हणजे दुय्यम हा समज विद्यार्थी आणि पालकांनी दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतर शैक्षणिक-संशोधनासह व्यावसायिक क्षेत्रातही अनेक वाटा खुल्या होतात, असे मत ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक डॉ. श्रीराम गीत यांनी बुधवारी मांडले.

‘लोकसत्ता’तर्फे  आयोजित ‘मार्ग यशाचा’ या वेब-संवादात डॉ. गीत यांनी कला शाखेतील विविध अभ्यासक्रम, पदवी-पदव्युत्तर पदवीनंतरच्या संधी, परदेशातील शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा अशा सर्व अंगाने सविस्तर माहिती दिली. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी स्वाती के तकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी-पालकांच्या प्रश्नांना डॉ. गीत यांनी उत्तरे दिली. ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

डॉ. गीत म्हणाले, की विद्यार्थ्यांला दहावी उत्तीर्ण होऊन कितीही गुण असल्यास कला शाखेत प्रवेश घेता येतो. ५० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेश घेतल्यास दरवर्षी दोन टक्के  वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवावे. म्हणजे पदवीला विशेष श्रेणी मिळवून पुढील वाटचाल दमदार होऊ शकते. पारपंरिक पदवी घेऊन विषयाला पूरक अभ्यासक्रम, कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण के ल्यास रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय संबंध, मानवशास्त्र, मानसशास्त्र, ललित कला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरसंधी मिळतात. कला शाखेत पदवी-पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडायचे असल्यास एमबीए, बँकांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षांचा मार्ग खुला आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपले छंद जोपण्यासाठी अधिक वेळ मिळतो. त्या वेळेचा जास्तीत जास्त चांगला वापर के ला पाहिजे. पदवीनंतर संगणकीय कौशल्ये, इंग्रजी, संवाद कौशल्य आत्मसात के ल्यास सहज नोकरी मिळू शकते. आजुबाजूला काय घडते आहे, कशाला मागणी आहे याचा अंदाज घेतला पाहिजे.

मानसशास्त्र पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम केल्यावर बालमानसशास्त्र, समुपदेशन, वैद्यकीय मानसशास्त्र या संदर्भात शाळा, रुग्णालयांमध्ये, तसेच करिअर समुपदेशक म्हणून संधी मिळू शकते. मानसशास्त्रात करिअर करण्यासाठी चिकाटी आणि चिवटपणा हवा. संशोधनाच्या सर्व संधी आपापल्या कु वतीनुसार, शिकण्याच्या इच्छेवर अवलंबून आहेत. पीएच.डी साठी ऑक्सफर्ड, केंब्रिजसारखी विद्यापीठे विद्यार्थ्यांचे स्वागत करतात. मात्र त्यासाठी समग्र, एकत्रित विचार करण्याची कुवत हवी. पत्रकारिता, जनसंज्ञापन (मास कम्युनिके शन) अभ्यासक्रम के ल्यावर दूरचित्रवाणी वाहिन्या, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ, चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क  अशा क्षेत्रात संधी मिळतात. तर गणित, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र हे एकमेकांना पूरक विषयक आहेत. या विषयांतील पदवी-पदव्युत्तर पदवीधारकांना केंद्र शासन सेवा, स्वयंसेवी संस्था, माहिती तंत्रज्ञान संस्थांमध्येही संधी निर्माण होऊ शकतात. परदेशी भाषा शिकल्यास इंटरप्रिटर, अनुवाद, कंटेंट रायटर म्हणून नोकरी मिळू शकते. करोनामुळे आदरातिथ्य, पर्यटन, हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राला सध्या कमी मागणी आहे.

पण एकु णात या क्षेत्रांना दीर्घकालीन मागणी आहे. हॉटेल मॅनेजमेंट के लेल्यांना तीन-चार-पाच तारांकित हॉटेलांमध्ये संधी मिळते. दहा वर्षे नोकरी के ल्यानंतर स्वत:चा व्यवसाय उद्योग सुरू करता येतो. भूगोलच्या पदवीधारकांना मॅपिंग, सर्व्हेसाठीच्या संधी मिळू शकतात. तसेच जिओइन्फर्मेटिक्ससारख्या शाखेत पुढील शिक्षण घेता येऊ शकते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना संग्रहालयशास्त्र, उत्खननशास्त्र, मानवशास्त्र अशा शाखांचे पर्याय खुले होतात, असेही डॉ. गीत यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेस फायदा…

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पदवीच्या शेवटच्या वर्षाला विचार करण्यापेक्षा पाच वर्षे सातत्यपूर्ण पद्धतीने अभ्यास करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पदवी पूर्ण करून  नोकरी करता करता स्पर्धा परीक्षांची तयारी करणे शक्य आहे. ठरावीक पद डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या स्पर्धा देऊन  प्रत्येक परीक्षेत स्वत:ला तपासणे आवश्यक आहे. तसेच पहिल्या नोकरीतून मिळणारा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. दहावीचे गणित, तर्क विचार, शब्द क्षमता याचा पदवीच्या पाच वर्षांत थोडा थोडा अभ्यास करत राहिल्यास एमबीए प्रवेश परीक्षा, बँकांच्या परीक्षा, यूपीएससी-एमपीएससीच्या परीक्षांसाठी फायदा होतो. पदवीचे शिक्षण घेताना सजगपणे अवांतर वाचन, वृत्तपत्र वाचन आवश्यक आहे. अभियांत्रिकी शाखेच्या तुलनेत कला शाखेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे पडतात हा गैरसमज आहे. आपण उद्दिष्ट ठेवून किती व्यवस्थित अभ्यास करतो यावर बरेच काही अवलंबून आहे, असेही डॉ. गीत यांनी स्पष्टपणे सांगितले.

प्राध्यापक, शिक्षक होण्याचे स्वप्न नको..

पीएच.डी. नेट-सेट, डी.एड. बी.एड. करून शिक्षक, प्राध्यापक होण्याचे स्वप्न आता पाहू नये. गेल्या वीस वर्षांत शिक्षक-प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. हे चित्र कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात शिकवण्या घेणे हा पर्याय ठरू शकतो, असे डॉ. गीत म्हणाले.

आज काय?  वाणिज्य शाखेतील संधी

मार्गदर्शक – बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (स्वायत्त महाविद्यालय)

माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ

उद्या…   विज्ञान शाखेतील संधी मार्गदर्शक – विवेक वेलणकर

वेळ – संध्याकाळी ५ वाजता

सहप्रायोजक – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/LS_MargYashacha येथे नोंदणी आवश्यक…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:23 am

Web Title: many business opportunities from the art branch akp 94
Next Stories
1 बहुशाखीय, सर्वसमावेशक शिक्षणाची उच्च शिक्षणात अंमलबजावणी
2 पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला
3 महत्त्वाकांक्षी नदीसंवर्धन प्रकल्पाला गती
Just Now!
X