पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं अमिष दाखवत प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांनी कोथरुड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रणव मराठे यांनी एकूण १८ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुभांगी काटे (वय ५९, रा. कोथरूड) असं फिर्यादी महिलेचं नाव आहे.

nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे ज्वेलर्समार्फत सोने, चांदी आणि मूळ रकमेवर जादा परतावा मिळेल असे आमिष नागरिकांना दाखवण्यात आलं होतं. यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले. पण बरेच दिवस होऊनदेखील पैसे मिळाले नाही. याबाबत ज्वेलर्स व्यवस्थापनाकडे विचारणा केल्यावर कोणत्याही प्रकाराची माहिती शुभांगी काटे यांनी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रणव मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास करण्यात आला असता १८ गुंतवणूकदारांची तब्बल ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झालं आहे. या सर्व गुंतवणुकदारांचे पैसे प्रणव यांनी स्वतः फायद्यासाठी वापरल्याचं निष्पन्न झालं असून त्या आधारे प्रणव मराठेला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.