27 September 2020

News Flash

“मला राजकारणात येण्याची ऑफर होती…पण”, नाना पाटेकर यांनी केला खुलासा

मला राजकारणात येण्याची ऑफर होती असा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला आहे

मला राजकारणात येण्याची ऑफर होती असा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे नाना पाटेकर यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तरं दिली. “मला राजकारणात येण्याची ऑफर होती. पण राजकारण माझा पिंड नाही. तिथं गेलो तर कोणकोणत्या पक्षात जायचं. एका वेळेनंतर पुढे पक्षच उरणार नाहीत. शेवटी मी एकटाच राहायचो,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं.

नाना पाटेकर यांनी यावेळी बोलताना सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत असं मत व्यक्त केलं. “राजकारण्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. आपण मत देतो, मग प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पाच वर्षांनी एकदा मत मिळतं. मग, त्याचे धिंडवडे का काढता? का त्याची गाढवावर बसून धिंड काढता? सामान्य नागरिक गप्प बसतो. याचा मला खूप त्रास होतो,” असं यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांनी यावेळी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोलाही लगावला.

शेतकरी भिकारी नाहीत
नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना भावनिक पाठिंबा आणि प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितलं. “राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना पैसे नाही दिले तरी चालतील. त्यांना फक्त कर्जमाफी नाही तर भावनिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची गरज असते. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, शेतकरी काही भिकारी नाहीत,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ही माझा, शरदराव ही माझेच, देवेंद्र ही माझाच
नाना पाटेकर यांनी यावेळी बोलताना आपलं काम करतो तो मग कोणत्याही पक्षाचा असो सांगत अमित शाह यांनी आपलं काम पटकन करुन दिल्याचं सांगितलं. उद्धव ही माझा, शरदराव ही माझेच, देवेंद्र ही माझाच असंही यावेळी ते म्हणाले.

मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता
भाजी घेताना मोल करु नका असं आवाहन यावेळी नाना पाटेकर यांनी केलं. “कांद्याचा दर वाढला की बजेट कोलमडलं अशी आरडाओरड सुरु होते. तुमचे एखाद्या महिनयाचे बजेट कोलमडले तर काय फरक पडतो. त्या बळीराजाचं आयुष्याचं बजेट कोलमडलं आहे. त्याचाही कधीतरी विचार करा. मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता. भाजीचे मोल करु नका,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 11:28 am

Web Title: marathi actor nana patekar maharashtra politics sgy 87
Next Stories
1 मुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ : नाना पाटेकर
2 मनसेच्या नव्या भूमिकेसाठी आशीर्वाद देणाऱ्या ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाची सर्वत्र चर्चा
3 ‘शस्त्रसज्ज’ नगरसेवकांना अटकाव!
Just Now!
X