करमाळा, पुणे आणि मुंबई या प्रवासात अनेक अनुभव आले. त्यामध्ये पुण्यात आल्यावर भाषेमुळे न्यूनगंड वाटायचा. त्यामुळे इंग्रजी बोलता, म्हणून थोर आहात आणि मराठी बोलत आहात म्हणून डाऊन मार्केट होत नाही. त्यामुळे भाषा हे केवळ माध्यम असून आशय महत्वाचा आहे. आपण बाटलीला महत्व देतो, औषधाला देत नाही. असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांनी व्यक्त केले.

जागतिक मराठी अकादमी आयोजित जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची कवी रामदास फुटणे आणि विवेक वाघ यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी पिस्तुल्या ते झुंड पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
यावेळी नागराज मंजुळे म्हणाले की, “लहान वयात अमिताभ बच्चन आणि मिथुन यांचे चित्रपट पाहून मोठा झालो आहे. या अभिनेत्या प्रमाणे अ‍ॅक्शन देखील करायचो,पण जसे हळूहळू समजू लागले. तेव्हा वाटले की, ना बच्चन, ना मिथुन आपण तर जब्या आहोत, हे समजले आणि आता पुढे हेच करायचं हे कळलं. तेव्हा वर्तमान पत्र, काही पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. मात्र कुसुमाग्रजांच्या साहित्यातून मला वाचनाची गोडी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर लिखाणाकडे वळलो, त्यामधून पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंड हा चित्रपट सर्वांच्या समोर येणार आहे.यातील फँड्री या चित्रपटाच्या नावा बद्दल सांगायच झाल्यास, फँड्री हा कैकाडी भाषेत शब्दात वापरला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

झुंड चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन असून त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभवाबद्दल ते म्हणाले की, “2016 च्या आसपास अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटलो. तेव्हा त्यांना झुंड चित्रपटाबद्दल सर्व सांगितले. आयुष्यभर ज्या व्यक्तीचे चित्रपट पाहत मोठा झालो आणि त्यांच्या सोबत झालेली भेट अविस्मरणीय होती.  प्रेक्षकांमधून सैराट हा चित्रपट बद्दल विचारले असता ते म्हणाले की, सैराट हे नाव तुकाराम महाराजांच्या गाथेतून आलं आहे. या चित्रपटाने खूप काही दिले असल्याची भावना नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.