23 September 2020

News Flash

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

भिशीतून घेतलेल्या राणीहाराबाबत व पैशाच्या कारणावरून सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

| August 27, 2015 07:21 am

भिशीतून घेतलेल्या राणीहाराबाबत व पैशाच्या कारणावरून सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आंबेगावातील गणेश व्हिला सोसायटीत मंगळवारी ही घटना घडली. विद्या नरेश कांबळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची आई विजया तांबे (वय ४९, रा. धारावी, मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून विद्या यांचा पती नरेश अशोक कांबळे (रा. गणेश व्हिला सोसायटी, आंबेगाव, धनकवडी) याच्यासह कुंटुंबातील चौघांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या व नरेश यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला आठ वर्षे व दीड वर्षे वयाची दोन मुले आहेत.  नरेश याला दिलेल्या २० ते २२ लाख रुपयांबाबत विद्याचे सासरे तिला सातत्याने हिशेब मागत होते. त्याचप्रमाणे विद्याने भिशीतील पैशातून स्वत:साठी राणीहार घेतला होता. या दागिन्याबाबतही तिच्याकडे सातत्याने विचारणा करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्या छळाला कंटाळून तिने स्वयंपाकगृहात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 7:21 am

Web Title: married women commit suicide
Next Stories
1 सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीत बदल
2 संभाजी उद्यानातील बांधकामाला स्थगिती
3 पथकांची शिस्त हरवली; सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर
Just Now!
X