News Flash

पिंपरीत विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सासरच्यांकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे.

Married women suicide : सासरच्यांकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे. अनेकदा तिला मारहाणही केली जात असल्याचे संगीता यांच्या वडिलांनी सांगितले.

पिंपरीत शुक्रवारी मध्यरात्री एका विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना घडली. संगीता राजेश सिंग अस आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संगीता यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, संगीता यांचे वडिलांनी राम नरेश प्रसाद यांनी या आत्महत्येसाठी संगीता यांच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. सासरच्यांकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे. अनेकदा तिला मारहाणही केली जात असल्याचे संगीता यांच्या वडिलांनी सांगितले. संगीता आणि राजेश यांचा विवाह १० वर्षांपूर्वीच झाला होता. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 4:01 pm

Web Title: married women suicide by jumping from 4th floor of building in pimpri
Next Stories
1 चिमणबागेत आठ दुचाकी पेटवल्या
2 प्राधिकरणातील बांधकामे अनधिकृतच?
3 सुमन कल्याणपूर यांना पुलं स्मृती सन्मान
Just Now!
X