पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासाभरातच तब्बल ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. जोरदार सरींमुळे तासाभरातच रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुरू होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारीही चांगल्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे शहरात दाखल झाल्यापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. शहराला दमदार पावसाची अपेक्षा होती. ती गुरुवारच्या पावसाने पूर्ण झाली. यापूर्वी ९ जूनला शहरात जोरदार पूर्वमोसमी सरी बरसल्या होत्या. त्यामुळे सुमारे ४० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने या हंगामातील उच्चांक नोंदविला. दुपारी आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन मोठय़ा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी चांगल्या पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते.

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
pistols Nagpur city
नागपूर शहरात पुन्हा वाढला पिस्तुलांचा वापर

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार २८ ते ३० जून दरम्यान शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. १ आणि २ जुलैला दुपारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ३ जुलैला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात हलक्या सरी कोसळत असल्याने उकाडा घटला आहे. गुरुवारी कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.