02 March 2021

News Flash

पिंपरी महापौरांचा विदेश दौरा – पाच लाखाच्या खर्चास मंजुरी

पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे येत्या २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत बेल्जियम, स्वीडन व फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

| September 11, 2013 02:38 am

पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे येत्या २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत बेल्जियम, स्वीडन व फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी सध्या परदेशात अभ्यासासाठी गेले आहेत. महापौरांच्या विदेश दौऱ्याचे कारणही अभ्यास दौरा हेच सांगण्यात आले आहे.
युरोपियन बिझनेस अॅन्ड टेक्नॉलॉजी सेंटरच्या वतीने २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी महापौर लांडे विदेशात जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ऐनवेळी मांडण्यात आला. त्यात महापौरांच्या दौऱ्यासाठी होणाऱ्या पाच लाख रूपये खर्चास मान्यता देण्यात आली. या दौऱ्यात २५ ते २७ सप्टेंबर नान्टिस (फ्रान्स), ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर ब्रुसेल्स (बेल्जियम) आणि २ ते ४ ऑक्टोबर माल्मो (स्वीडन) या ठिकाणी होणाऱ्या परिषदेत महापौर सहभागी होणार आहेत. आयुक्त यशदाच्या वतीने अभ्यासदौऱ्यात सहभागी झाले असून ते परदेशात आहेत. सोमवारी ते रूजू होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:38 am

Web Title: mayor mohini lande on study tour
Next Stories
1 ऐन गणपतीत चऱ्होलीत पाण्याचा ‘ठणठणाट’
2 बोगस डॉक्टर सुषमा कोठारी गजाआड
3 अवैध वाहतुकीसाठी चिंचवडला दरमहा १८ लाखांची ‘हप्तेगिरी’
Just Now!
X