News Flash

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी केला हवेत गोळीबार?

नवीन पिस्तूलातून गोळीबार केल्याची चर्चा

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम नागरिक महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण पाणलोट क्षेत्रात हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. दरम्यान, याप्रकरणी आपण असे काही केलं नसल्याचे महापौर राहुल जाधव यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना स्पष्ट केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आज जलपूजनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे महापौरांसह अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी महापौर राहुल जाधव यांनी सपत्निक जलपूजन केले. त्यानंतर पवना धरण परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करून काही कार्यकर्त्यांसह महापौर बाहेर आले आणि जवळ असलेली नवीन पिस्तूल काढून दाखवत हवेत दोन गोळ्या झाडल्या असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर सर्वजण महापौरांच्या दिशेने धावत आले, हे पाहून महापौर गोंधळले असल्याचेही सांगितले जात आहे.

काही महिन्यापूर्वीच महापौरांना पिस्तूलाचा परवाना मिळाला असून त्यांनी हवेत गोळीबार केला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या घटनेचा एक फोटो व्हारल झाला असून, त्यात महापौरांच्या हातात पिस्तूल दिसत आहे. तर, कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहत असल्याचेही फोटोत दिसत आहे. जलपूजनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले हे देखील उपस्थित होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 10:00 pm

Web Title: mayor of pimpri chinchwad fires in the air
Next Stories
1 पुण्यातील डॉक्टरांचा कौतुकास्पद निर्णय, पूरग्रस्तांच्या सेवेसाठी संपात सहभागी होण्यास नकार
2 पुणे-मुंबई ट्रेन अजून दोन दिवस राहणार बंद
3 VIDEO: हिंजवडीत पोलीस कर्मचाऱ्याची दारूसाठी दादागिरी
Just Now!
X