02 March 2021

News Flash

पांडवनगर आणि वडारवाडीतील दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पांडवनगर, वडारवाडी या भागात दहशत निर्माण करून घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आदी गुन्हे करणाऱ्या दहा जणांच्या टोळीवर चतु:श्रुंगी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई

| January 26, 2014 02:50 am

पांडवनगर, वडारवाडी या भागात दहशत निर्माण करून घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आदी गुन्हे करणाऱ्या दहा जणांच्या टोळीवर चतु:श्रुंगी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.
अविनाश सुनील पवार (वय २२), संतोष मधुकर दणाणी (वय २५), सुनील रामचंद्र पवार (वय ४८), अमित राजू सपकाळ (वय २३), संतोष भाऊसाहेब झुंगे (वय २७), दीपक बाबुराव जाधव (वय ४०) आणि सोमनाथ शंकर धोत्रे (वय ३५, रा. सर्वजण वडारवाडी, शिवाजीनगर) अशी मोक्कांतर्गत अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर पांडवनगर येथे ऑक्टोबर २०१३ मध्ये टाकलेल्या दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरोडा टाकताना यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी पांडवनगर, वडारवाडी या भागात आणि शहरात घरफोडी, दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. आरोपींना अटक करून सात जणांवर मोक्कांतर्गत करावाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्याकडे चतु:श्रुंगी पोलिसांनी पाठविला होता. त्यांच्यावर मोक्का लावण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील या करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 2:50 am

Web Title: mcoca act crime pandavnagar wadarwadi arrested
टॅग : Arrested
Next Stories
1 भोसरीत तरुणाचा खून; तिघांना अटक
2 -पाषाण तलावाच्या सुशोभीकरणानंतर काही पक्ष्यांच्या संख्येत घट
3 मेट्रोच्या पाचशे मीटपर्यंत चार एफएसआयवर शिक्कामोर्तब
Just Now!
X