कोथरुडच्या माजी भाजपा आमदार आणि भाजपाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना राखीही बांधील. या भेटीसंदर्भात मेधा कुलकर्णी यांनीच ट्विटरवरुन माहिती दिलीय.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एक रकमी ५ लाख रुपये अथवा दरमहा ५००० हजार वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी पंतप्रधानांकडे केली,” असं ट्विट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. अनेक महिलांना करोनामुळे पती गमावावा लागला, त्यामुळे त्यांचा आधार कायमचा गेला आहे. अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर मुलाबाळांसह संसार चालवण्याची जबाबदारी आली आहे. असं असताना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी कोणतीही मदत न केल्याबद्दलची नाराजीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली. तसेच अशा गरजू महिलांना मदत करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना तयार करण्याची गरज आहे असं मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं. अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, “या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखील मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला,” असंही म्हटलं आहे.

AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

सर्वात आधी केलेल्या ट्विटमध्ये मेधा यांनी मोदींना राखी बांधतानाचे तीन फोटो पोस्ट करत त्याला, “अलौकिक, अद्वितीय व्यक्तिमत्वाची अविस्मरणीय भेट,” अशी कॅप्शन दिलीय. ही भेट पंतप्रधान निवासस्थान म्हणजेच ७ लोक कल्याण मार्ग येथील प्रशासकीय निवासस्थानी झाल्याचं मेधा यांनी म्हटलं आहे.

मेधा कुलकर्णी या सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री झालेल्या अनेक नेत्यांची भेट घेतलीय. यामध्ये स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचीही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत लसीकरण मोहीम, त्यातील अडथळे, छोट्या खाजगी रुग्णालयांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, आणि इतरही काही मुद्द्यांबाबत निवेदन दिल्याचं मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.