प्राणवायू लेखापरीक्षण नाहीच

पुणे : करोनाबाधितांची संख्या घटली असल्याने सध्या वैद्यकीय प्राणवायूची गरज निम्म्याने घटली आहे. यापूर्वी करोनाबाधितांपैकी पाच ते सहा टक्के  रुग्णांनाच प्राणवायूची गरज असताना १५ टक्के  रुग्णांना प्राणवायू देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. आल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांमधील प्राणवायू वापराचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या प्राणवायूचा वापर कमी झाल्याने त्याबाबत लेखापरीक्षणच केले नसल्याचे समोर आले आहे.

रुग्णांच्या तुलनेत प्राणवायूचा वापर अधिक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खासगी रुग्णालयांमधील प्राणवायूच्या वापराची पडताळणी करणे, भरणा के ंद्रांवर देखरेख ठेवण्याचे आणि सर्व रुग्णालयांना प्रतिदिन किती प्राणवायूची गरज आहे याची माहिती संकलित करण्याच्या सूचना गेल्या महिन्यात देण्यात आल्या होत्या. एक महिन्यानंतरही लेखापरीक्षण करण्यात आले की नाही, याबाबत प्रशासनाकडून माहिती दिली जात नसल्याचे समोर आले आहे.

अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे उपआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, की पुणे जिल्ह्य़ात सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाकडून २३० मेट्रिक टन प्राणवायूची मागणी होती. त्यानुसार पुरवठा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात के वळ १६० मे. टन प्राणवायूचा वापर झाला. परिणामी उर्वरित प्राणवायूचा साठा शिल्लक राहिला. ऑक्टोबर महिन्यातही ही मागणी निम्म्याने कमी झाली आहे. मात्र, अचानक रुग्णसंख्या वाढल्यास अतिरिक्त साठा प्रत्येक शासकीय आणि खासगी रुग्णालयांना देऊ के ला आहे, तरीदेखील प्राणवायू शिल्लक राहत असल्याचे दिसून येत आहे.

वैद्यकीय गरज भागवून उद्योगांना प्राणवायू

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्राणवायूच्या एकू ण उत्पादनापैकी ८० टक्के  प्राणवायू वैद्यकीय वापरासाठी, तर २० टक्के  औद्योगिक वापरासाठी निश्चित करण्यात आला होता. मात्र, सप्टेंबरअखेरपासून शहरासह जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. परिणामी वैद्यकीय प्राणवायूची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. दुसऱ्या बाजूला उद्योगचक्र सुरू झाले असून प्राणवायू सुरळित नसल्याने अनेक उद्योगांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने वैद्यकीय प्राणवायूची गरज भागवून उर्वरित प्राणवायूचा पुरवठा उद्योगांना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार प्राणवायू उत्पादन करणाऱ्या कं पन्यांमधील प्रत्यक्ष उत्पादन आणि व्यवस्थापनाचे लेखापरीक्षण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या मागनीनुसार वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने वैद्यकीय कारणांसाठी निश्चित के लेला प्राणवायूचा साठा शिल्लक राहत असल्याने उद्योगांना प्राधान्यानुसार पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

–  एस. बी. पाटील, अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे उपआयुक्त