News Flash

कर्करोग, एचआयव्ही व हिपेटायटिस ‘सी’वरील औषधे अत्यावश्यक औषधांच्या यादीत

कर्करोग, एचआयव्ही व हिपेटायटिस ‘सी’वरील औषधांसह १०६ औषधांचा शासनाने अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे एकूण अत्यावश्यक औषधांची संख्या ३७६ झाली आहे.

कर्करोग, एचआयव्ही व हिपेटायटिस ‘सी’वरील औषधांसह १०६ औषधांचा शासनाने अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे एकूण अत्यावश्यक औषधांची संख्या ३७६ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या गाभा समितीने गुरुवारी ‘नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शिअल मेडिसिन्स’च्या (एनएलईएम) यादीत १०६ नवीन औषधांचा समावेश केला, तर ७० औषधे या यादीतून वगळली गेल्याचे मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. विविध आजारांचा देशातील प्रादुर्भाव, आरोग्य समस्यांचा प्राधान्यक्रम आणि परवडण्याजोगे उपचार या प्रमुख निकषांवर अत्यावश्यक औषधे ठरवली जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 2:30 am

Web Title: medicine on cancer hiv and hepatitis c list of indispensable medicine
टॅग : Cancer,Medicine
Next Stories
1 फोटोग्राफीमुळे चित्रकलेचा आयाम बदलला
2 व्हॅन खड्डय़ात कोसळून आजी आणि नात ठार
3 पंतप्रधानांची भेट घडवून आणण्यात मुख्यमंत्री अपयशी
Just Now!
X