येरवडा येथील कारागृहातील कैद्यांच्या पलायनाच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. न्यायालयीन सुनावणीसाठी बाहेर पडणारे कैदी बऱ्याचदा कारागृहात परतताना मोबाईल, तीक्ष्ण शस्त्रे तसेच अमली पदार्थ आणण्याची शक्यता असते. त्यामुळे येरवडा येथील कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर धातुशोधक यंत्रंही (मेटल डिटेक्टर) बसविण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक कैद्याची तपासणी करण्यासाठी कारागृह रक्षकांना सहज हाताळता येण्याजोगे छोटे हॅण्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले आहेत. कारागृहाच्या परिसरात मोबाईल जॅमरही बसविण्यात आले आहेत.

राज्यातील येरवडा (पुणे) कारागृह, नवी मुंबईतील तळोजा, मुंबईतील ऑर्थर रोड कारागृह, ठाणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद येथील कारागृहांची क्षमता मोठी आहे. तेथील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार येरवडा कारागृहात विविध सुधारणा करण्यात आल्या असून कैद्यांचे पलायन रोखण्याच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती राज्य कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्यांमागे किरकोळ वाद हे कारण असल्याचे निरीक्षणही कारागृह प्रशासनाने नोंदविले आहे. अशा घटना रोखण्यासाठी बराकीत होणाऱ्या किरकोळ घटनांवर नजर ठेवण्याच्या सूचना कारागृह प्रशासनाने कारागृह रक्षकांना दिल्या आहेत.

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला आरोपी मिर्झा हिमायत बेग हा सध्या नागपूर येथील कारागृहात आहे. बेग याने नागपूरमधील युग चांडक या शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणातील आरोपी राजेश दवारे याला कारागृहात मारहाण केली. कारागृह प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रक रणाची चौकशी करण्यात येणार असून बेग याच्याविरुद्ध नागपूर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने डॉ. उपाध्याय म्हणाले, की कारागृहात कैद्यांमध्ये अचानक वाद होतो. चेष्टा-मस्करीतून कैद्यांमध्ये मारामारी होते. अशा घटना रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बराकीतील किरकोळ गोष्टींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच राज्यातील सर्व कारागृह रक्षकांना देण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह कारागृहात धातुशोधक यंत्रही  मारहाण केली. त्यात दवारे जखमी झाला. कारागृह प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रक रणाची चौकशी करण्यात येणार असून बेग याच्याविरुद्ध नागपूर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने डॉ. उपाध्याय म्हणाले, की कारागृहात कैद्यांमध्ये अचानक वाद होतो. त्यामागची कारणे देखील किरकोळ असतात. चेष्टा-मस्करीतून कैद्यांमध्ये मारामारी होते. अशा घटना रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बराकीतील किरकोळ गोष्टींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच राज्यातील सर्व कारागृह रक्षकांना देण्यात आल्या आहेत.