News Flash

विकासकामे दाखविण्यासाठी खटाटोप

त्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे कामे करण्यासाठी अवघे नऊ महिन्यांचा कालावधी असणार आहे.

मेट्रो प्रकल्प, वाजपेयी रुग्णालय, महाविद्यालयाला गती देण्याचे भाजपचे प्रयत्न

पुणे : एक वर्षावर आलेली निवडणूक, करोना संसर्गामुळे वाया गेलेले वर्ष, रखडलेले प्रकल्प या कात्रीत सापडलेल्या भारतीय जनता पक्षाची विकासकामे दाखविण्यासाठी खटपट सुरू झाली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रुग्णालय आणि महाविद्यालयाला गती देण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून प्राधान्य देण्यात आले असून समान पाणीपुरवठा योजना काही ठरावीक प्रभागांत कार्यान्वित करण्यात येणार आहे.

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असून निवडणुकीसाठीची आचारसंहिता या वर्षी डिसेंबर महिनाअखेरपर्यंत लागू होणार आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरच शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेकडूनही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महापालिके त भाजपची सत्ता असून पक्षाचे तब्बल ९८ नगरसेवक आहेत. नगरसेवकांकडून प्रभागस्तरावर झालेली  विकासकामे आणि त्याचा अहवाल करण्यात येत असला तरी शहर विकासाच्या दृष्टीने कोणत्या योजना, प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे पडला आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे कामे करण्यासाठी अवघे नऊ महिन्यांचा कालावधी असणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोना संसर्गाचा उद्रेक शहरात सुरू झाल्यामुळे महापालिके ची विकासकामे, योजना आणि प्रकल्पांची कामे थांबली. त्यातच राज्य शासनाने महापालिके च्या खर्चावरही मर्यादा आणल्या. त्यामुळे विकासकामे होऊ शकली नाहीत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कामांना गती देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही गेल्या आठवड्यात प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. निवडणूक विकासकामांच्या मुद्यावर होणार असल्यामुळे कोणती कामे पूर्ण झाली, हे नागरिकांना सांगावे लागणार आहे. सध्या पूर्ण झालेल्या भामा-आसखेड प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही महत्त्वाकांक्षी योजनेचे काम झालेले नाही. त्यामुळे आता वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके वर मेट्रोची चाचणी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

महापालिके ने पाच वर्षापूर्वी समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांना प्रारंभ के ला. मात्र या योजनेची कामे संथ गतीनेच सुरू आहेत. या कामांच्या खर्चाची प्रक्रियाही वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे आता शहरातील दोन किं वा तीन प्रभागात ही योजना कार्यान्वित करण्यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातून समान पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण होत असल्याचे दाखविण्यात येण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्प राज्य शासन आणि केंद्र सरकारचा असला तरी तातडीने काही मार्गांवर चाचणी घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.

प्रकल्पांचा आढावा आणि सद्य:स्थितीची माहिती सातत्याने घेतली जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणता येणार नाही. शहराचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट आहे.  करोना संसर्गामुळे कामे करता आली नाहीत. महापालिके ला उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे कामांनाही गती देण्याचा प्रयत्न आहे.

– मुरलीधर मोहोळ, महापौर, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:50 am

Web Title: metro project vajpayee hospital school college bjp akp 94
Next Stories
1 निवडणुकांच्या तोंडावर भूमिपूजन, उद्घाटनांचा धडाका
2 शहराच्या वाढीव पाण्याबाबत निर्णयाची शक्यता
3 उजनी जलाशयावर पक्षी निरीक्षकांना ‘मोरघारां’ची भुरळ
Just Now!
X