मुंबईनंतर आता पुण्यातही मेट्रो रेल्वे धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. निगडी ते स्वारगेट असा पुणे मेट्रोचा पहिला टप्पा असून त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आज महत्त्वाची बैठक पार पडली. मेट्रोच्या निगडी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याबाबत सदर बैठकीत सर्वांचे एकमत झाले. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पाला तातडीने मंजुरी दिली आहे. मात्र, वनाज ते कोथरूड या दुसऱया मार्गासाठी एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या मार्गासाठी गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती त्यावर निर्णय घेणार असून, त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.