25 October 2020

News Flash

लग्नाचे वऱ्हाड असणाऱ्या पोलीस व्हॅनची सात ते आठ गाड्यांना धडक

पुण्यातील कोंढवा परिसरात घडली घटना

या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात पोलीस व्हॅनने शुक्रवारी रात्री उशिरा सात ते आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. तर या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोंढवा परिसरात एमएच ४२ बी ६९४८ या क्रमांकाच्या पोलीस व्हॅनमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड जात होते. त्याच वेळी या व्हॅनने अचानक रस्त्यावरील सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. घटनेत या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

‘रोहिंग्या, बांग्लादेशींचा वाढता वावर सुंजवा लष्करी हल्ल्यास जबाबदार?’

धडक दिलेल्या पोलीस व्हॅनमध्ये लग्नाचे वऱ्हाड असून त्या व्हॅनचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचा व्हॅनवर ताबा न राहिल्यामुळेच ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सदर घटनेविषयी अद्यापही कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसून लग्नाच्या वऱ्हाडासाठी वापरण्यात आलेली ही व्हॅन पाहता पोलिसांच्याच नातेवाईकांचे लग्न असल्याचा प्राथमिक अंदाज सध्या बांधण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:34 pm

Web Title: midnight incident in pune police van dashed other vehicles on road
Next Stories
1 धक्कादायक ! पिंपरीत एकाच दिवशी बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल
2 राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प
3 कर्मचाऱ्यांअभावी परिवहन खात्याचा बट्टय़ाबोळ- परिवहन मंत्री रावते
Just Now!
X