News Flash

भीमा कोरेगाव हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना दुसऱ्या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी

शिरुर कोर्टाने सुनावली कोठडी

मिलिंद एकबोटे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील एक आरोपी मिलिंद एकबोटे यांना कोर्टाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. या हिंसाचार प्रकरणातील दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या येरवडा कारागृहात असलेल्या एकबोटेंना चौकशीसाठी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

भीमा कोरेगाव येथे दंगल घडवून आणल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर प्रमुख सुत्रधार म्हणून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगलीची चिथावणी आणि कट कारस्थान केल्याचे दोन गुन्हे मिलिंद एकबोटे यांच्यावर अनुक्रमे पिंपरी आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

दंगलीला चिथावणी दिल्याप्रकरणी एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत असून येरवडा कारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, आज त्यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने एकबोटेंना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यासंदर्भात शिक्रापूर पोलिसांनी शिरुर तालुका न्यायालयात एकबोटेंचा ताबा मिळावा अशी विनंती केली होती.

त्यामुळे आता येरवडा कारागृहात असणाऱ्या मिलिंद एकबोटेंना चौकशीसाठी शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 2:20 pm

Web Title: milind ekbote get 4 day police custody in second crime in case of bhima koregaon violence
Next Stories
1 अंगावर पत्नीचे फोटो चिटकवून पतीची आत्महत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना
2 संत्र्यांना पुन्हा उच्चांकी भाव!
3 संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
Just Now!
X