राज्य सरकारने पेट्रोलवरील अधिभारात ६ रुपयांवरून ९ रुपये वाढ केल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोलच्या दरात ३ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र या पेट्रोल दरवाढीबाबत राज्याचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. पेट्रोल दरवाढीबाबत मला काहीच माहित नाही, तपासून पाहतो, असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली.

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील अधिभारात ३ रुपयांनी वाढ केल्याने दर वाढले असून नवीन दर मध्यरात्रीपासूनच लागू झाले आहेत. महामार्गावरील दारुबंदी झाल्याने सरकारच्या महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड सामान्यांना बसत आहे. याबाबत पिंपरी – चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, आपल्याला याबाबत काहीच माहित नाही, तपासून पाहतो, असे गिरीश बापट यांनी सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी पेट्रोलियम पदार्थांचे दर हे आंतरराष्ट्रीय किंमतीवर अवलंबून असतात, असे सांगितले. काही दिवसापूर्वी हे दर कमी झाले होते. पेट्रोलचे दर कमी अथवा वाढवणे हे राज्य सरकारच्या अधिकारात नसते. ते जागतिक पातळीवर ठरवले जातात. ते कधी कमी तर कधी वाढतात, असेही त्यांनी सांगितले. त्यावर पेट्रोलच्या किंमती केवळ महाराष्ट्रातच वाढल्या आहेत, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितल्यानंतर याबाबत मला काहीच माहित नाही, तपासून सांगतो, असे सांगून वेळ मारून नेली. राज्य सरकारमधील मंत्र्यांनाच घेतलेले निर्णय माहित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
maharashtra prantik tailik mahasabha , demands, check vijay wadettiwar caste certificate, prakash devtale, sudhir mungantiwar, pratibha dhanorkar, chandrapur lok sabha seat,
“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; खोट्या स्वाक्षऱ्या करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा आरोप
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

दरम्यान, भाजपच्या कार्यकारिणीचे राज्यस्तरीय अधिवेशन २६, २७ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहितीही यावेळी दिली. बाजारात चीन अंड्यांच्या विक्रीविषयी विचारले असता, कुठल्याही अंड्यांमध्ये प्लॅस्टिक नव्हते, असे स्पष्ट केले आहे.