मावळ परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मावळ तालुका हा भात लागवडीसाठी प्रसिद्ध असून भात लागवडीची लगबग सुरू आहे. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे हे मावळचे सुपुत्र असून नुकतच त्यांना राज्यमंत्री पद मिळाल आहे. त्यांनी मावळ परिसरातील गाव भेटीचा कार्यक्रमाला जात असताना चक्क गुडघाभर पाण्यात उतरून भात लागवड केल्याचं पाहायला मिळालं. ते स्वतः शेतकरी असून भात लागवड करू लागल्याने शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचं त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे हे दुपारी गाव भेटी निमित्त ओझर्डे येथे जात होते. तेव्हा त्यांना भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी बोलावले आणि स्वागत केले. भेगडे हे स्वतः शेतकरी आहेत त्यांना भात लागवड करण्याची इच्छा झाली आणि थेट ते भात लागवड सुरू असलेल्या शेतात उतरले. गुडघाभर पाण्यात उतरून त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात लागवड केली. त्यावेळी शेतकरी देखील भारावले. चक्क राज्यमंत्री पाण्यात उतरून भात लावत असल्याने त्यांचे कौतुक ही झाले. बळीरा राजा सुखी व्हावा यासाठी विठुरायकडे साकडं घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.