News Flash

पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात पाणी पिण्याचा बहाण्याने घरात घुसून एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अचानकपणे ओढावलेल्या या प्रसंगामुळे पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीने संबंधित घटनेची माहिती आईला दिल्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी अण्णा बबन कांबळे (रा. वाकड) याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमधील पीडित मुलीची आई धुणे भांड्याची कामे करते. आई कामावर गेल्यानंतर अण्णा कांबळे पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडित मुलीच्या घरात घुसला. मुलगी एकटी असल्याची खात्री पटल्यानंतर या नराधमाने १४ वर्षींय मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर मुलगी खूप घाबरली. आई घरी परतल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने संशयित आरोपी अण्णा बबन कांबळेच्या विरोधात वाकड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. अद्याप संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसत आहे. अनुचित प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:57 pm

Web Title: minor girl harassment case in pimpari chinchwad
Next Stories
1 छगन भुजबळांची लवकरच सुटका होईल- राज्यमंत्री दिलीप कांबळे
2 तांत्रिक कारणांमुळे कर्जमाफी देण्यास विलंब
3 आधारसाठी लांबच लांब रांगा
Just Now!
X