News Flash

पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीय घेत होते शोध

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील हडपसर येथे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे चौघांनी अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हडपसर येथील ससाणेनगर भागात राहणारी १५ वर्षीय तरुणी बाहेर जाऊन येते सांगत २६ ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ होऊनदेखील मुलगी घरी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. २९ तारखेला तरुणी दुपारच्या सुमारास सासवड येथे सापडली. तरुणीने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचं सांगितलं”. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. दोन आरोपींना पकडण्यात यश आलं असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 5:23 pm

Web Title: minor girl kidnap and gangraped in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 लग्नास नकार देणार्‍या तरुणीवर ॲसिड हल्ल्याची धमकी
2 पुणे-मुंबई प्रवासासाठी भुर्दंड
3 बिस्कीटहट्टामुळे अनेक आजारांना निमंत्रण
Just Now!
X